*एक गाव एक मानाची दहीहंडी*
*पिंगुळी सरपंच अजय आकेरकर यांची मध्यस्थी असफल*…
कुडाळ
एक गाव एक दहीहंडी व्हावी याकरिता पिंगुळी सरपंच यांनी गावातील मंडळांची एकत्रित बैठक मान्यवर लोकांच्या समक्ष आयोजित करून समज गैरसमज मिटवून तोडगा काढला होता.
या बैठकीत गावात अनेक मंडळे आहेत तेव्हा कुठल्याही मंडळाचे नाव न देता,वादविवाद न करता *पिंगुळी गावाची मानाची दहीहंडी* 2025 हे नाव देऊन, पैशाच्या ऑडिट करिता गावातील एक रजिस्टर मंडळ साईकला मंच याचे नाव पुरस्कृत म्हणून देण्यात यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले होते.परंतु दोन दिवसांनी गावातील सखे सोबती मित्रमंडळाने गावाचा ठरलेला कार्यक्रम आपल्याच मित्र मंडळाने आयोजित करीत असल्याचे जाहीर केले.
या विरोधात गावातील मंडळांनी नाराजी व्यक्त करीत आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी एकत्रित बैठक आयोजित केली होती. यामध्ये सर्वानुमते ठरलेल्या विषयांना बाजूला सारून सखे सोबती मित्र मंडळ पूर्णतः चुकीचे वागत आहे. यामध्ये सर्व मंडळांची व गावाची फसवणूक ते करीत आहेत,सरपंच आणि मान्यवरांच्या मध्यस्थीला त्यांनी केराची टोपली दाखवली असून,त्यामध्ये सरपंच तोंडघशी पडले आहेत,अशी चर्चा करण्यात आली. यामुळे यंदाच्या साईकला मंच व सखे सोबती मित्र मंडळ आयोजित दहीहंडीत गावातील इतर मंडळे व आजच्या बैठकीत उपस्थित ग्रामस्थ सहभागी होणार नाहीत, असा एकमुखी ठराव करण्यात आला..तसेच पुढच्या वर्षी गावाचे एकत्रित दहीहंडी नियोजना संदर्भात सदर मंडळाला वगळून बैठक लावून निर्णय घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले..
आजच्या बैठकीत सरपंचांना निमंत्रित केले होते,परंतु ओरोस येथे कामात व्यस्त असल्याने ते उपस्थित राहिले नाही.फोनद्वारे त्यांना संपर्क केला असता,मागील तडजोडीच्या बैठकीत सखे सोबती मित्र मंडळाचे नाव न देण्याबाबत चर्चाच झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.यावर बैठकीत उपस्थित सर्वांनी सत्याची पडताळणी करण्याकरिता पिंगुळी ग्रामदेवता श्री देव रवळनाथ मंदिरात येण्याचे आवाहन संबंधितांना केले आहे…
सदर बैठकीस श्री विष्णू धुरी, संकेत धुरी,सतीश धुरी,मिलिंद परब अण्णा रणसिंग, सागर रणसिंग, महेश पालकर ,दत्तगुरु राऊळ, भरत परब,चेतन राऊळ, उज्वल प्रभू, केतन शिरोडकर,रोहन परब,राहुल पालव,उत्तम गावडे,दत्ता पाटील, गौरव राऊळ,साईराज दळवी,प्रसन्न गंगावणे,मकरंद पिंगुळकर,प्रथमेश धुरी,प्रदीप माने,सचिन गुंड,अमित कुराडे,धीरज परब यांच्यासह गावातील पन्नास ते साठ ग्रामस्थ उपस्थित होते..
