निमगाव-पाटो पूल रस्त्याच्या निकृष्ट कामावर ग्रामस्थांचा दबाव;
प्रशासनाने मान्य केल्या सर्व मागण्या, उपोषण मागे
बांदा
निमगाव ते पाटो पूल रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नाराजी व्यक्त करत श्री. निलेश मधुकर सावंत, श्री. मनोज सुरेश कल्याणकर, श्री. राकेश किसनदास केसरकर, श्री. गिरीश विजय भोगले आणि श्री. हेमंत विनायक दाभोलकर यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.
या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत आज पंचायत समितीचे अधिकारी श्री. टेमकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे नियोजित उपोषण मागे घेण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासानानुसार महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे आहेत:
1. रस्त्याचे काम नव्याने काँक्रिटीकरण करून करण्यात येईल.
2. बोगदा ते पई हॉटेल रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी वाहतुकीस योग्य केला जाईल.
3. निमजगा जिल्हा परिषद शाळा ते बोगदा रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने भरले जातील.
4. तेली तिठा ते मिशाळ घर रस्ता खड्डे बुजवून सुरळीत केला जाईल.
5. उर्वरित 160 मीटर रस्त्यासाठी तात्काळ मंजुरी घेऊन डांबरीकरण पूर्ण केले जाईल.
या यशस्वी पाठपुराव्याबद्दल उपोषणकर्त्यांनी निमजगा व आळवाडा येथील ग्रामस्थांचे विशेष आभार मानले आहेत.
