१५ ते १७ ऑगस्ट दरम्यान श्री महालक्ष्मी हॉल येथे विविध उत्पादने, महिला उद्योजिकांना प्रोत्साहन
कुडाळ :
दरवर्षीप्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त “विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता श्री महालक्ष्मी हॉल, कुडाळ – सिंधुदुर्ग येथे होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी मान्यवर म्हणून सन्मा. आमदार श्री. नितेश राणे साहेब (मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तसेच पालकमंत्री सिंधुदुर्ग) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. संध्या प्रसाद तेरसे, अध्यक्षा – नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ हे भूषवणार आहेत.
हे विशेष प्रदर्शन १५, १६ व १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत श्री महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती नजीक येथे भरवण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला उद्योजिका व व्यावसायिक, विशेषतः घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा नर्मदाआई संस्थेचा गेल्या काही वर्षांपासूनचा उपक्रम आहे. स्थानिक उद्योजकांकडून उत्तम दर्जा, विश्वासार्हता, वाजवी दर आणि सर्व आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत स्थानिक व्यावसायिक व ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
सर्वांनी या महोत्सवाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. संध्या तेरसे यांनी केले आहे.

