*महाळुंगे येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न*
देवगड –
महाळुंगे येथील ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र फणसगाव यांच्या संयुक्त विध्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला आरोग्य तपसणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, क्षय रोग मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्वांची छाती एक्सरे काढून तपसणी करण्यात आली, इसीजी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब या तपसण्या मोफत करण्यात आल्या शिबिरामध्ये ११५ ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला, शिबिराचे औपचारिक उदघाट्न सरपंच संदीप देवळेकर, ग्रामसेवक आबा हिरवे, डॉ. जगदीश पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दीपक परब, सुभाष नवले,उदय साटम,रवींद्र सावंत, सुवर्णा घाडीगावकर, साक्षी तोरस्कर, जिवाजी राणे, महेश राणे उपस्थित होते
शिबिराचे आयोजन अश्विनी काडगे, महादेव कोकरे, आकाश सावंत, कृष्ण खरात, संतोष जुवाटकर, तन्वी नांदलसकर, सुचिता जाधव, सोनाली कोकरे, तृप्ती कांबळे, विनोद परब, आकांशा राणे, रेश्मा घाडी, भारती राणे यांनी केले होते
कार्यक्रम फोटो 👇

