You are currently viewing सिंधुदुर्गमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न –

रानभाज्यांचे महत्व अधोरेखित, पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली

आत्मा सन २०२५-२६ अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉलमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला. आत्मा प्रकल्प संचालक सिंधुदुर्ग, तालुका कृषी अधिकारी कणकवली, कणकवली कॉलेज, स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग व उमेद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

महोत्सवात रानभाज्यांची ओळख, आहारातील महत्त्व, प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा प्रकल्प संचालक श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे, प्राचार्य श्री. महालिंगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री. ओहोळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

रानभाज्यांचे शास्त्रीय व पोषणमूल्याबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री. संदीप राणे व श्री. वामन पंडित यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना ‘जनसमर्थ पोर्टल’ द्वारे केसीसी कर्जासाठी आवश्यक प्रक्रिया देखील सांगण्यात आली.

प्रदर्शनात कोकणातील २८ प्रकारच्या रानभाज्यांचे सादरीकरण करण्यात आले. पाककृती स्पर्धेत २६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी श्रीम. समता कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. उमाकांत पाटील यांनी केले.

— अजित नाडकर्णी, संवाद मिडीया

 

प्रतिक्रिया व्यक्त करा