You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील महसूल रिक्त पदांच्या भरतीसाठी आमदार दीपक केसरकर यांचा महसूल मंत्र्यांना पत्रव्यवहार

दोडामार्ग तालुक्यातील महसूल रिक्त पदांच्या भरतीसाठी आमदार दीपक केसरकर यांचा महसूल मंत्र्यांना पत्रव्यवहार

दोडामार्ग तालुक्यातील महसूल रिक्त पदांच्या भरतीसाठी आमदार दीपक केसरकर यांचा महसूल मंत्र्यांना पत्रव्यवहार

दोडामार्ग

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील महसूल विभागातील रिक्त पदे भरावीत, यासाठी थेट राज्याचे महसूल मंत्री मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवले आहे.

केसरकर यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, दोडामार्ग तालुका हा दुर्गम भागात पसरलेला असून येथे महसूल विभागातील अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. विशेषतः तहसीलदार पद सध्या प्रभारी अधिकार्‍यांकडे असून, नियमित नियुक्ती झालेली नाही. यामुळे नागरिकांना महसूल संबंधित कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तसेच, दोडामार्ग तालुक्यातील तळकट आणि साटेली ही लोकवस्तीच्या दृष्टीने महत्त्वाची गावे असून, येथे महसूल विभागाशी संबंधित कामकाज मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, सध्या या दोन्ही गावांमध्ये मंडळ अधिकारी पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, आमदार केसरकर यांनी महसूल मंत्र्यांना विनंती केली आहे की, सदर रिक्त पदे तातडीने भरून दोडामार्ग तालुक्यातील प्रशासन कार्यक्षम करण्यात यावे, जेणेकरून स्थानिक जनतेच्या समस्या दूर होऊ शकतील.

त्यांच्या या पुढाकारामुळे लवकरच शासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा