You are currently viewing बांदा शहरात स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येला भव्य तिरंगा यात्रेचे नियोजन

बांदा शहरात स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येला भव्य तिरंगा यात्रेचे नियोजन

बांदा :

७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट रोजी बांदा येथे सर्व भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या तिरंगा यात्रेस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गडगेवाडी येथून ठीक ३ वाजता सुरुवात होईल. ही यात्रा श्रीराम चौक बांदा, हॉस्पिटल कट्टा, गांधीचौक, तेली तिठा मोर्येवाडा मार्गे श्री देव बांदेश्वर मंदिर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. श्रीदेव बांदेश्वर मंदीरात या यात्रेचा समारोप केला जाईल. या यात्रेस जास्तीत जास्त नागरिकांनी, शाळा कॉलेज मधील विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष बांदा मंडल अध्यक्ष श्री स्वागत रघुवीर नाटेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी ठीक १०.३० मिनिटांनी डेगवे येथील हुतात्मा देऊ नाईक यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात ययेईल व आदराजंली वाहीली जाईल.

तसेच हर घर तिरंगा हे अभियान सुद्धा सर्व देशप्रेमी नागरिकांनी पार पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, भारतीय जनता पक्षाचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बांदा मंडल कार्यकारणी सदस्य संदीप बांदेकर, राकेश केसरकर हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा