*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*💦सरता श्रावण*💦
सरत चालला आता श्रावण
जरा थांब , आभाळले मन…
थेंबांच्या त्या झोक्यावरती
तुझ्यासवे ती झुलली प्रीती…
इंद्रधनूचे रंग मनावर
तुला भेटण्या यावे सत्वर….
ऊनपाऊस नभ धरा खेळते
थेंब टपोरे कुशीत घेते….
हिरवाई ही श्रावणातली
बघता नयनी तनू मोहरली…
निरोप घेऊस नको श्रावणा
विरह तुझा रे मना साहिना….
रिमझिम श्रावण अता दूर दूर
घुमती अंतरी मल्हाराचे सूर….!!
००००००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
