*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तरून जाऊ अडचण सागर*
समर्थ आहोत आंम्ही पक्षी
*कशास घेता शस्त्रे हाती*
सोन्यासारखा जन्म मिळाला
सांभाळुया आपली *नाती*
//1//
कशाला छेडता व्यर्थ लढाई
धर्म पंथ असतात सोईसाठी
पक्षानी जाव कुठल्या कोर्टात
कोणाच्या घ्याव्यात भेटीगाठी
//2//
घालून दाणे निर्जन *स्थळी*
कोर्टाची बंदी तर *उठवावी*
वाचवून वेळ काढा सुवर्णमध्य
पिढी कबुतरांची तर वाचवावी
//3//
काढून यामधे *सुवर्णमध्य*
माणसांनी माणसासारखे वागा
देऊन आव्हानास प्रति आव्हान
सोडून द्यावा आपला *त्रागा*
//4//
वेळ आणीक *खेळ पैशाचा*
उगाच आपण *व्यर्थ दवडता*
सूज्ञ असूनही सारे विचारवंत
टोकाचा मार्ग कशास निवडता
//5//
नांदा आपण *सौख्य भराने*
नका देऊ “कुणीही: चेतावणी
आम्हा शापहो *गुप्त रोगांचा*
आपण माणस वागा शहाणी
//6//
करून आपण कोर्ट कचे-या
बिघडणार आहे शांती सागर
*खाद्य ठेवून पठारावरती*
तरून जाऊ “अडचणसागर”
//7//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
मंगळवार 12 ऑगस्ट 2025
