🏆 सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी १६-१७ ऑगस्टला!
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस (ता. कुडाळ) येथे रंगणार आहे.
📅 वयोगट व जन्मतारीख निकष
१४ वर्षाखालील : १५-१०-२०११ ते १४-१०-२०१३
१६ वर्षाखालील : १५-१०-२००९ ते १४-१०-२०११
१८ वर्षाखालील : १५-१०-२००७ ते १४-१०-२००९
२० वर्षाखालील : १५-१०-२००५ ते १४-१०-२००७
२३ वर्षाखालील : १८-१०-२००२ ते १७-१०-२००५
🥇 स्पर्धा प्रकार
१४ वर्षाखालील गट:
१०० मी., ६०० मी., लांबउडी, गोळाफेक (१ कि.ग्रा.)
ट्रायथलॉन A, B, C गट
१६ ते २० वर्षाखालील गट:
कोणतेही २ इव्हेंट + रिले
कंबाईन इव्हेंट्स:
१६ ऑगस्ट – पहिले इव्हेंट
१७ ऑगस्ट – उर्वरित इव्हेंट
💰 शुल्क रचना
१४ ते १८ वर्षाखालील:
प्रति इव्हेंट ₹१००
ट्रायथलॉन ₹३००
कंबाईन/रिले ₹५००
२० व २३ वर्षाखालील:
प्रति इव्हेंट ₹२००
कंबाईन/रिले ₹५००
📌 महत्वाच्या सूचना
जन्मतारीख प्रमाणपत्र किंवा आधारकार्ड झेरॉक्स आवश्यक
इतर जिल्ह्यातील खेळाडूंनी NOC आणणे बंधनकारक
शुल्क ऑनलाइन भरावे; स्पॉट एन्ट्री नाही
UID नंबर आवश्यक
विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल
📞 संपर्क:
कल्पना तेंडुलकर – ९३५९३९६४५०
बाळकृष्ण कदम – ९१६७४६७७९६
अध्यक्ष श्री. रंजीतसिंग राणे यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
