सिंधुदुर्ग जिल्ह्यात “राजर्षि शाहु महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना” समिती पुनर्गठित
सिंधुदुर्ग
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि मा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार “राजर्षी शाहु महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना” अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे.
सदर समितीत ९ मान्यवर कलाकार आणि १ साहित्यिक सदस्य यांचा समावेश करण्यात आला असून, संबंधित सदस्यांची नावे शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहेत. या समितीचे उद्दिष्ट जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना मानधनाच्या स्वरूपात सन्मानित करणे आहे.
समितीची रचना
श्री. संतोष हरिश्चंद्र कानडे, मु. पो. पियाळी, ता. कणकवली
श्री. रितेश गणपत सुतार, मु.पो.लोरे नं. २, ता. वैभववाडी श्री. विष्णू शिवा सुतार, मु. पो. साटेली भेडशी, ता. दोडामार्ग
श्री. अजिंक्य कृष्णा पाताडे, मु.पो. सुकळवाड, ता. मालवण
श्री. संदीप पायाजी नाईकधुरे, मु.पो.बापार्डे, ता.देवगड
श्री. मयूर मंगेश ठाकूर,
श्री. विजय मधुकर सावंत, मु. पो. कडावल, कुडाळ
श्री. भालचंद्र भगवान केळूसकर, मु.पो. वायरी भूतनाथ, ता. मालवण
श्री. महेंद्र एकनाथ गवळी, मु.पो. कारीवडे, ता. सावंतवाडी
श्री. राघोजी भगवान सावंत (साहित्यिक), मु.पो.केसरी, ता. सावंतवाडी
या समितीत सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचा देखील समावेश असून, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग हे सदस्य सचिव म्हणून कार्य पाहणार आहेत.
