वैभववाडी :
भारतमातेच्या सुपुत्रांचा गौरव करण्यासाठी “सन्मान माजी सैनिकांचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे होणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन श्री. प्रमोद रावराणे, सचिव – स्थानिक समिती, महाराणा प्रताप शिक्षण संस्था यांनी केले आहे.
कार्यक्रमात देशसेवेसाठी योगदान दिलेल्या माजी सैनिकांचा गौरव करण्यात येणार असून देशभक्तीपर वातावरणात देशप्रेम जागवणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
