वैभववाडी :
बुद्धिस्ट आंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BEACI) – सिंधुदुर्ग, संघटने मार्फत तालुक्यातील महिला व अनुसूचित जाती, जमाती उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी काल एक दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमातशासकीय योजनांची माहिती देऊन उद्योगासाठी लागणारे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री. सूर्यकांत पाटील तहसीलदार वैभववाडी ,गट विकास अधिकारी श्री वालावलकर, पोलिस उपनिरीक्षक (PSI) वैभववाडी श्री. मनोज सोनवलकर ,बुद्धिस्ट आंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BEACI) चे कार्यक्रम संयोजक श्री.ॲड. विशाल जाधव – जिल्हा अध्यक्ष श्री. हर्षवर्धन बोरवडेकर , *कार्यक्रम निमंत्रक – श्री.भीमराव भोसले, श्री. रवींद्र तांबे, श्री. विनोद कदम,* तालुका संघटनेचे श्री.रवींद्र पवार, श्री. सुभाष कांबळे, श्री. संतोष कदम, श्री.मंगेश कांबळे खंबाळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाला 200 हून अधिक तालुक्यातील महिला व अनुसूचित जाती जमातीतील व उद्योग करू इच्छिणारे महिला व पुरुष उपस्थित होते.
तहसीलदार वैभववाडी श्री. सूर्यकांत पाटील यांनी उद्योजकांना शासकीय परवानग्या, दाखले आणि प्रशासकीय प्रक्रियांबद्दल माहिती दिली, आवश्यक तिथे दाखले व परवानग्या तात्काळ मिळण्यासाठी सहकार्य केले जाईल व कोणत्याही उद्योगासाठी सरकारी नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
गट विकास अधिकारी श्री .वालावलकर यांनी ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या संधींवर प्रकाश टाकला. कृषी आधारित उद्योग, बचत गटांचे महत्त्व आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा वापर करून उद्योग कसा वाढवता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
पोलिस उपनिरीक्षक (PSI) वैभववाडी श्री. मनोज सोनवलकर यांनी कोणत्याही उद्योगात कायद्याचे पालन करणे, सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि शांततामय वातावरणात व्यवसाय कसा करावा, याबद्दल माहिती दिली. त्यांनी महिला उद्योजिकांना विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याबाबत सांगितले .
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून महिलांसाठी एक महिन्याचे मोफत पिशव्या ,गाद्या तयार करण्याचे प्रशिक्षण वैभववाडी येथे सुरू झाले आहे, त्यासाठी लाभार्थी निवड जिल्हा उद्योग केंद्र व एम सी डी यांच्या मार्फत मुलाखती घेऊन काल निश्चित करण्यात आली आहेत, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैभववाडीतील उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजक – संयोजक श्री . विशाल जाधव यांनी या सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना व वित्तीय संस्था यांच्यात समन्वय आणून तालुक्यात पहिल्या टप्प्यात त्यांना शिवण यंत्रसामग्री देऊन दीडशे पेक्षा जास्त छोटे छोटे उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात उद्योजकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, जिल्हा उद्योग केंद्र, ओरोस, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (NSIC) नॅशनल शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब हब, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, बँकेचे अधिकारी आणि इतर विविध सरकारी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नव उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विविध योजनांची माहिती दिली, ज्यात उद्योगासाठी लागणाऱ्या योग्य योजनांची माहिती दिली कार्यक्रमाला विविध बँकांचे अधिकारी देखील उपस्थित होते युनियन बँक ऑफ इंडिया चे,शाखा व्यवस्थापक श्री दाभोळकर , कुडाळ होऊन विशेष उपस्थितीत राहुन शाखा व्यवस्थापक श्री. अभिषेक शिरूरकर यांनी नवोदित आणि इच्छुक उद्योजकांना मार्गदर्शन केले, व्यवसायासाठी योग्य आर्थिक नियोजन ,बँकेकडून उपलब्ध होणारी कर्ज आणि योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, पात्रता निकष काय असतात आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असते, याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. यामुळे अनेक उद्योजकांना व्यवसायासाठी भांडवल मिळवण्याचा मार्ग सोपा झाला श्री. अभिषेक शिरूरकर केलेले हे मार्गदर्शन उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. यामुळे त्यांना केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे, तर व्यवसायाच्या विविध पैलूंवर योग्य प्रकारे नियोजन करण्याचे मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी उद्योजक श्री .हर्षवर्धन बोरवडेकर यांनी व्यवसाय
यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास (Market Research), ग्राहक संबंध जपण्याचे महत्त्व आणि व्यवसायात डिजिटल तंत्रज्ञानाचा (Digital Technology) वापर करण्याचे फायदे यावर त्यांनी भर दिला.
*शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत नेऊन औद्योगिक चळवळ उभी करण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रण सरपंच श्री. भीमराव भोसले यांनी केले.*
यशस्वी उद्योजकांकडून प्रेरणा आणि अनुभव.शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती या बाबींचा समावेश होता.
जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग ओरस च्या उद्योग निरीक्षका कोमल माने यांनी जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग मार्फत असणाऱ्या विविध अनुदानित योजना आणि उद्योगासाठी उपलब्ध आर्थिक मदतीची माहिती दिली.
नॅशनल एसीएसटी हबचे श्री तरेश घोरमोडे यांनी या संस्थेने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी केंद्र सरकारच्या विशेष योजनांची माहिती दिली, ज्यामुळे त्यांना उद्योगासाठी विशेष प्रोत्साहन मिळते.
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ: या महामंडळाने मागासवर्गीय समाजातील उद्योजकांसाठी असलेल्या कर्ज योजना आणि इतर कल्याणकारी कार्यक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक संभाव्य उद्योजकांना प्रेरणा मिळाली असून, त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि मार्गदर्शन मिळाल्याचा विश्वास वाटतो. यामुळे, भविष्यात वैभववाडी तालुक्यात उद्योजकतेचे वातावरण अधिक सुदृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रवींद्र तांबे, श्री .भीमराव भोसले श्री. विनोद कदम ,श्री .भीमराव भोसले, श्री. सुभाष कांबळे,श्री.रवींद्र पवार, श्री.संतोष कदम , श्री. रवींद्र जंगम श्री. मंगेश कांबळे खांबाळेकर, उमेद चे श्री.सुशांत कदम, गौरी अहिर व श्री विशाल जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.

