You are currently viewing वेरली गावच्या माजी मुख्याध्यापिका सुरेखा वेरलकर यांचे निधन

वेरली गावच्या माजी मुख्याध्यापिका सुरेखा वेरलकर यांचे निधन

मालवण :

मालवण तालुक्यातील वेरली गावच्या रहिवाशी आणि माजी मुख्याध्यापिका सुरेखा उत्तम वेरलकर (वय ८५) यांचे निधन झाले. वेरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वेरलकर यांनी सुमारे दहा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम केले. याच प्रशालेतून १९९८ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. तत्पूवी त्यांनी तिरवडे, महान, डांगमोडे, राठीवडे या ठिकाणी शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. त्यांनी ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले. येथील टोपीवाला हायस्कुलचे पर्यवेक्षक देविदास वेरलकर आणि कालिदास वेरलकर यांच्या त्या आई, भाजप ओबीसी महिला मालवण अध्यक्षा पूजा वेरलकर यांच्या सासू, दशरथ निव्हेकर यांच्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा