सहसा मुले गाव सोडून पुणे मुंबई बेंगलोर आणि परदेशात गेले की गावाला विसरतात. गावाला तर सोडाच पण आई-वडिलांना पण विसरल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. पण याला अपवाद आहेत ते मिशन आय.ए.एस.चे अध्यक्ष .श्री ज्ञानदेव मोडक हे त्यांचे नाव.
उद्या दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.कमलताई गवई यांच्या हस्ते त्यांनी अमरावती कारंजा लाड रोडवर असणाऱ्या नागझरी पासून जवळ असलेल्या माळेगाव फाट्यावर 100 झाडांचे वृक्षारोपण करायचे ठरविले आहे. याशिवाय नागझिरी ते कारंजा लाड या प्रत्येक बस स्टॉपवर ते टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करणार आहेत.
त्याची सुरुवात दिनांक 12 ला होत आहे.
श्री ज्ञानदेव मोडक हे अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयाचे विद्यार्थी. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावाकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे. त्यांचे घर अमरावतीच्या साधना कॉलनीमध्ये आहे .तसे ते मूळचे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील शेलुवाडा येथे राहणारे. पण आता मुंबईला स्थायिक झालेले आहेत. पण महिन्यातून दोन चकरा ते अमरावतीला आणि गावाकडे मारतात.
अमरावतीहून कारंजा लाडला जात असताना त्यांच्या लक्षात आले की या रोडवर जिथे जिथे फाटा आहे बस स्टॉप आहे तिथे पुरेशी झाडे नाही आहेत
त्यामुळे बस स्टॉप वर वाटसरू यांच्यासाठी पुरेशी सावली येत नाही.
ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी लगेच नागझरी ते कारंजा लाड या रोडवर वृक्षारोपण करायचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम निवडला तो नागझिरी ते कामरगाव या रोडवरील माळेगाव फाटा. या माळेगाव फाट्यापासून तर ऋषी महाराज मंदिरापर्यंत शंभर झाडांची लागवड करून ते या उपक्रमाचा सुरुवात करणार आहेत आणि मग टप्प्याटप्प्याने प्रत्येक फाट्यावर म्हणजेच बस स्टॉप वर वडाची झाडे ते लावणार आहेत. या 100 झाडांमध्येही त्यांनी वड जांभूळ कडुलिंब अशी झाडे निवडली आहेत .या कामी त्यांना वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री हरिहर बोचरे यांचे देखील भरघोस सहकार्य प्राप्त होत आहे.
कुणी पुढाकार घेणारे असले म्हणजे लोक पटकन मदतीला येतात. मिशन आय ए एस चे अध्यक्ष श्री ज्ञानदेव मोडक यांनी हा उपक्रम जाहीर करताच विद्याभारती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राऊत माळेगाव गावातील माजी सरपंच श्री रुपेश साहेबराव कडू श्रीकृष्ण माधव भागवत योगेश बाबाराव साबळे व माळेगाव गावकरी मंडळी त्यांच्या मदतीला आली आहेत.
एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात या निमित्ताने होत आहे. अमरावतीवरून किंवा आपल्या गावातून मुंबईला पुण्याला बेंगलोरला परदेशात स्थायिक झालेल्या प्रत्येकाने जर असा सकारात्मक दृष्टिकोन ठरविला तर खूप काही होऊ शकते. कारंजा लाड येथील मसालाकिंग श्री धनंजय दातार यांचे नाव तर त्यांच्या समाजसेवेमुळे सर्व दूर पसरले आहे .ते देखील परदेशात राहून आपल्या कारंजा लाड शहराची निगा राखत असतात .त्यांच्या जोडीला आता श्री ज्ञानदेव मोडक यांनी नागझिरी ते कारंजा लाड या रोडवर लागणाऱ्या सगळ्या फाट्यांवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले आहे आणि त्याची सुरुवात उद्या दिनांक बारा ऑगस्ट पासून होत आहे ही खरोखरच अभिनंदन व अनुकरणीय बाब आहे. यानिमित्त मिशन आय ए एस चे श्री ज्ञानदेव मोडक व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन देखील .
प्रा.डॉ नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प
9890967003
