You are currently viewing पावन शिदोरी

पावन शिदोरी

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पावन शिदोरी*

〰️〰️〰️〰️〰️

ओघळता रूप तुझे लोचनी

मी डुंबतो तुझ्या कृपासागरी

साक्षात्कारी स्पर्श अनामिक

रुजवितो भावभक्तीचा अंतरी

 

चिदानंदी , स्वर ओंकाराचा

मंत्रमुग्ध, करितो जीवनभरी

आत्माच.! खरा ब्रह्मस्वरूपी

सोबतीस मोक्षमुक्तीच्या द्वारी

 

सारेच मंगल, मंगल, मंगलम

चराचरात या अहंब्रह्म ईश्वरी

तादात्म्याच्या , अनुभूतीतूनी

अंतरी घुमते मंजुळ हरिपावरी

 

हीच एक पुण्यकर्मी कृतार्थता

जन्मोजन्मीची पावन शिदोरी

नामानामात त्याच हरिहराच्या

लाभती , कृपावंती मुक्ती चारी

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

******* • *विगसा* • *******

प्रतिक्रिया व्यक्त करा