You are currently viewing आई भगवती देवीच्या उत्सवात भाविकांची अलोट गर्दी…

आई भगवती देवीच्या उत्सवात भाविकांची अलोट गर्दी…

कुडाळ

कुसबे :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, डोंगराच्या कुशीत वसलेल्या कुसबे गावची ग्रामदेवता श्री लिंग भगवती देवीचे मंदिर हे पुरातनकालीन आहे. सर्व कुसबेवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवती मंदिरात देवीचा गोंधळ उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

https://youtu.be/YiLcehsnqPc

वर्षभर विविध कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये देवीचा वार्षिक जत्रोत्सव, दसरा,त्रिपुरा पौर्णिमा,होळी आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. भगवती देवीचा उत्साहात साजरा होणारा वार्षिक जत्रोत्सव म्हणजेच देवीचा गोंधळ. आई भगवती देवी ही पोखरण गावच्या श्री लिंग रवळनाथ देवाची बहीण असल्याने या दोन्ही गावांचे एकमेकांशी घट्ट नाते आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ,कसाल पंचक्रोशीमध्ये या देवीची जत्रा खूप प्रसिद्ध आहे.

मंगळवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारनंतर देवीला साडी नेसवणे,आलेल्या माहेरवाशीणींकडून देवीची ओटी भरणे,नवस बोलणे – फेडणे, रात्री १२ वा. देवीचा पालखी प्रदक्षिणा सोहळा … या पालखी दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती.संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईने, फटाक्यांच्या आतिषबाजीत, व आई भगवती मातेच्या उदो उदो च्या जयघोषात निनादूून निघाला होता.रात्री १२नंतर देवीचा जयघोष करत गोंधळ घालण्यात आला.

-संवाद मिडिया साठी दिपाली घाडीगावकर, कसाल

प्रतिक्रिया व्यक्त करा