You are currently viewing *पुणे  जिल्ह्यात गुरुवारी  दिवसभरात ५०० नवे रुग्ण*

*पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ५०० नवे रुग्ण*

पुणे – जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ५०० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २२८ जण आहेत. गेल्या २४ तासांत ६२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत कायम राहिली आहे. उलट बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सक्रिय रुग्णांची संख्या आणखी १३६ ने कमी झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ हजार ८१५ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. बुधवारी हीच संख्या ४ हजार ९५१ इतकी होती.

दिवसभरात शहरातील सर्वाधिक २२८ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ११३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १३७, नगरपालिका क्षेत्रात १८ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रात चार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आजअखेरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज दिवसभरातील ८ जणांचा समावेश आहे. याशिवाय ४३७ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील तीन रुग्णांसह पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =