*बचतगटांच्या ताईंसाठी सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांचे महत्त्वपूर्ण पाऊल*
*चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुकूटपिलांना खाद्य पुरवठा व साहित्य पुरवठा न झाल्याबद्दल उपायुक्त पशुसंवर्धन विभागाला दिला लाक्षणिक उपोषणाचा इशारा*
*वैभववाडी-*
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहाची स्थापना करण्यात आली सदर अभियानांतर्गत समूहातील महिला लाभार्थी यांना चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले व एनजी एक्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या एजन्सीकडून वैभववाडी तालुक्यातील 200 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 100 पिल्लं सोबत 50 किलोच्या पाच बॅगा देणे अपेक्षित सुद्धा व काही लागणारे साहित्य त्याबरोबर देणे अपेक्षित होते सदर प्रमाणे प्रति लाभार्थी 100 पिल्लांसोबत पाच पैकी 50 किलो ची एक बॅग लाभार्थ्यांना देण्यात आली व पाच पैकी चार बेगा अजून मिळालेले नाहीत व साहित्यांपैकी शेडनेट अद्याप लाभार्थ्यांना मिळालेला नाही दीड महिना उलटून देखील लाभार्थ्यांना खाद्य मिळत नसल्यामुळे लाभार्थी त्रस्त आहेत विकत खाद्य आणून परवडत नाही त्यामुळे वारंवार संबंधित कार्यालयाकडे लोकप्रतिनिधी या नात्याने नवलराज काळे वारंवार संपर्क करून पाठपुरावा करत होते परंतु संबंधित कार्यालय कडून लाभार्थ्यांना न्याय देण्याजोगा कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता म्हणूनच समस्त लाभार्थ्यांची भावना ओळखून लाभार्थी यांच्या समवेत उपायुक्त पशुसंवर्धन विभाग सिंधुदुर्ग यांच्या विरुद्ध त्यांच्याशी संलग्न असलेले वैभववाडी तालुक्यातील उमेद कार्यालय येथे बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांनी दिला. 13 ऑगस्ट पूर्वी उर्वरित साहित्य व चार बॅगा खाद्यांच्या लाभार्थ्यांना पोच हव्यात अन्यथा संघर्ष अटळ आहे त्याचबरोबर आपण दिलेल्या कोंबड्या देखील आपल्या कार्यालयात आणून सोडण्याचा इशारा नवलराज काळे यांनी संबंधित अधिकारी यांना दिला आहे. यावरती संबंधित अधिकारी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ समीर बिलोलीकर यांनी नवलराज काळे यांना पत्र व्यवहार करून लवकरात लवकर उर्वरित चार बॅगा व शेडनेट देण्याचे आश्वासन दिले आहे व 13 ऑगस्ट रोजी उपोषण करू नये असे विनंती केले.
नवल राज काळे यांच्या या निर्णयामुळे बचत गटांच्या ताईंना मोठा दिलासा मिळेल यासाठीच बचत गटांच्या ताईंसाठी भाऊ नवलराज काळे धावून आले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

