You are currently viewing सिंधुदुर्गच्या प्रतीक्षा सराफदारची सुवर्ण कामगिरी

सिंधुदुर्गच्या प्रतीक्षा सराफदारची सुवर्ण कामगिरी

सिंधुदुर्गच्या प्रतीक्षा सराफदारची सुवर्ण कामगिरी 🏆🏹

कोल्हापूर :
नीरज चोप्रा सन्मानार्थ 7 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय भाला फेक स्पर्धेत सिंधुदुर्गची सुकन्या प्रतीक्षा सूर्यकांत सराफदार (कुडाळ) हिने 36.45 मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

या उल्लेखनीय यशाबद्दल अथलेटिक असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे कल्पना तेंडुलकर, किरण पिंगुळकर, बाळकृष्ण कदम आणि अध्यक्ष रणजितसिंह राणे यांनी प्रतीक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

सिंधुदुर्गच्या क्रीडा इतिहासात प्रतीक्षाने आणखी एक सुवर्णपान जोडत जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. 🎉

प्रतिक्रिया व्यक्त करा