You are currently viewing घरात घुसून सुरीचा धाक दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला जामिनावर मुक्तता

घरात घुसून सुरीचा धाक दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला जामिनावर मुक्तता

घरात घुसून सुरीचा धाक दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला जामिनावर मुक्तता

कुडाळ :

माणगाव येथे एका विवाहितेवर घरात घुसून सुरीचा धाक दाखवून बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्षद शरद करंगुटकर या आरोपीस जिल्हा न्यायालयात जामिनावर मुक्त करण्यात आले.

दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डॉ. सु. मा. देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपीच्या बाजूने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्ततेचा आदेश दिला.

सदर आरोपीच्या वतीने ॲड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी युक्तिवाद सादर केला. त्यांना ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव, व ॲड. सुयश गवंडे यांचे सहकार्य लाभले.

कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर २११/२०२५ व रे.क्री.के. ६७/२०२५ नुसार आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ६४(१), ३३२(बी), ३५१(२), व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल होता. आरोपीस ०५ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

सदर गुन्हा सत्र न्यायालयांतर्गत (Sessions Triable) असल्यामुळे आरोपीच्या बाजूने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पुराव्याचा अभ्यास करून व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस अटींसह जामिनावर मुक्त केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा