तुझ्या विना मज कोण तारी, विश्वकांत तारी शिक्षकाची सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला अखेरची हाक.
सावंतवाडी
विश्वकांत गणपत तारी यांचा आज सकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारदरम्यान निधन झालं ते आठ दिवसापूर्वी सावंतवाडी नगर परिषदेच्या दवाखान्यांमध्ये तपासणी करीत आले होते त्यावेळी त्यांना अर्धांगी वायूचा झटका आला आणि ते खाली पडले त्यांना सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यां मार्फत लगेचच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती बिघडत चालल्या कारणाने त्यांना तत्काळ पुन्हा सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
विश्वकांत गणपत तारी वय वर्ष 71 हे फॉरेन रिटर्न होते.
ते निरवडे येथील खाजगी शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर शिक्षकांना इंग्रजी बोलायला शिकवणे तसेच विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय शिकवत होते.
सुरुवातीला त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती परंतु कालांतराने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली.
ते अविवाहित होते त्यांच्या पश्चात त्यांना दोन सखे भाऊ आहे अशी माहिती समजली त्यांचे गाव देवगड येथे आहे परंतु सध्या त्यांचे भाऊ मुंबईमध्ये राहतात. सामाजिक बांधिलकी,हॉस्पिटल व पोलिसांमार्फत त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नातेवाईक येई पर्यंत त्यांची बॉडी आठ दिवसा पर्यंत ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या शीतगृहामध्ये ठेवण्यात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली तरी सामाजिक बांधिलकी व पोलिसांच्या मार्फत जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधला परंतु एकही माणूस त्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाही कदाचित त्यांच्या भावांना सुद्धा ही घटना समजली आहे त्यांच्यात वाद होते अशी देखील माहिती मिळाली.
खरच आज त्यांच्या जवळ लाखो रुपये असते तर विश्वकांतारी हे आजारी आहे हे कळताक्षणी त्यांचे नातेवाईक इथपर्यंत नक्कीच पोचले असते.
हि खरी आजची वस्तूचिती आहे. शेवटी एकच ज्याला कोणी नाही त्याला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हा एकमेव पर्याय उरला आहे असं आजकाल म्हटलं जातं ज्यांनी त्यांच्या मृत्यूची देखील जबाबदारी स्वीकारली आहे.
आठ दिवसात नातेवाईक न आल्यास सावंतवाडी स्मशानभूमी मध्ये सावंतवाडी पोलीस व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

