You are currently viewing वेताळबांबर्डेत उद्या ‘महाबली घटोत्कच संग्राम’

वेताळबांबर्डेत उद्या ‘महाबली घटोत्कच संग्राम’

वेताळबांबर्डेत उद्या ‘महाबली घटोत्कच संग्राम’

कुडाळ

वेताळबांबर्डे मित्रमंडळाच्यावतीने तेथीलच श्री देव वेतोबा मंदिरात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०० वाजता संयुक्त दशावतार मंडळाचे ‘महाबली घटोत्कच संग्राम’ नाटक होणार आहे. या नाटकात अलंबुश-सुयश ठाकुर, नारद-योगेश कोंडुरकर, भीम-प्रशांत मयेकर, कृष्ण-दत्तप्रसाद शेणई, वस्त्रासूर राक्षस-सुहास (मामा) माळकर, कामकंठका सुधीर तांडेल, सुंदर स्वरूपी-गोट्या येरागी, दुर्योधन-उदय मोर्ये, कर्ण-सागर गावकर, शकुनी-गौरव शिर्के, घटोत्कच-केशव खांबल, हिडिंबा-शिवा मेस्त्री आदी कलाकार आहेत. हार्मोनियम-संकेत कुडव, पखवाज-पियुष खंदारे, झांज-विनायक सावंत अशी संगीतसाथ आहे. कथा-संकल्पना नटवर्य पपू नांदोसकर यांची आहे. मोरेश्वर दशावतार मंडळ (मोरे) यांचे विशेष सहाय्य आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा