You are currently viewing ज्येष्ठ साहित्यिक प्रतिभा पिटके यांनी वर्ल्ड व्हिजन टाईम्सच्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेला शुभेच्छापर लेख

ज्येष्ठ साहित्यिक प्रतिभा पिटके यांनी वर्ल्ड व्हिजन टाईम्सच्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेला शुभेच्छापर लेख

*ज्येष्ठ साहित्यिक प्रतिभा पिटके यांनी वर्ल्ड व्हिजन टाईम्सच्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेला शुभेच्छापर लेख*

 

 

नागेश हुलवळे,एक धडपड्या तरुण! अहिल्यानगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जांभळे गावाचे ! लहानपणापासून काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात ठेवून त्यादृष्टीने त्यांचा सतत प्रयत्न असे! लहानपणापासून शिक्षणाची प्रचंड आवड! त्यामुळे शाळेसाठी रोज सहा कि मी ची पायपीट करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले! कष्ट करण्याची सवय! आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण घेतानाच त्यांनी नोकरी सुरू केली सुदैवाने एम. ए. बीएड झालेली उषा गृहलक्ष्मीच्या रूपाने जीवनात आली सरस्वती व लक्ष्मी चे रूप असलेल्या उषामुळे जीवनाला स्थिरता आली. परंतु एव्हड्यावर नागेशजीचे समाधान थोडी होणार? समाजासाठी, काहीतरी करणे हे आपले कर्तव्य आहे ही मनातली तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना!

विश्वप्रसिद्ध साहित्यिक डॉ मधुसूदन घाणेकरांच्या एका गौरव ग्रंथाचे त्यांनी संपादन केले होते तो अनुभव होताच! तसेच स्वतःचा *आनंदाच्या लहरी* हा काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केला आहे . दोन पुस्तकांचे मराठी – इंग्रजी अनुवादही प्रकाशित करण्यात आले आहेत. मराठबोली संस्था, पुणे तर्फे साहित्य भूषण हा पुरस्कार मिळालेल्या नागेशजींच्या पुरस्कारांची यादी पाहिली तर मन विस्मित होते .अनेक पुस्तकांचे संपादन केलेल्या नागेशजींना एव्हड्यावर समाधान नव्हते. विविध विषयांवर व्याख्यान शिबिरे व कार्यशाळा घेणे हा ही त्यांच्या अनेक उपक्रमातील एक उपक्रम आहे. समर्पण म्ह जे काय हे नागेशजी कडून शिकावे. आपण काही विशेष करतो असे त्यांना कधीच वाटत नाही इतके साधे सरळ व्यक्तिमत्व आहे त्यांचे!

समाजातील लिहित्या हातांना योग्य व्यासपीठ मिळावे ह्या एकमेव उद्देशाने त्यांनी ७ ऑगस्ट २०२३ रोजी वर्ल्ड व्हिजन टाईम्स ह्या डिजिटल दैनिकाची स्थापना केली.

त्यात अनेक नवोदित कवी लेखकांना संधी मिळाली आहे. समाजातील अद्यावत घटना, ज्ञान विज्ञान भक्ती कथा कविता ललित, अशा बहुरंगी साहित्याला एक हक्काचे व्यासपीठ मिळाले.

अर्थात हे सुरू करण्यामागे डॉ घाणेकरांची प्रेरणा महत्वाची आहे. दररोज सकाळी प्रकाशित करण्यात येणारे वर्ल्ड व्हिजन हे आधी अनियतकालिक होते. कारण नागेशजी नोकरीसाठी लोकलने प्रवास करतांना ते संपादित करतात ! दैनिकाचे सगळे काम तेमोबाईलवर करतात. अंक अधिक आकर्षक कसा करता येईल ह्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. व्हाट्सअप, फेसबुकद्वारे अंकाचे वितरण होते. वर्ल्ड व्हिजनला खरंतर आर्थिक मदतीची फार गरज आहे. म्हणून काही जाहिराती मिळाल्या तर थोडी आर्थिक अडचण दूर होऊ शकेल पण दुसऱ्यासमोर हात पसरणे नागेशजींच्या स्वभावातच नाही! त्यांच्या परिवाराची — साथ त्यांना आहेच! रोज प्रकाशित होणाऱ्या वर्ल्ड व्हिजनमध्ये चारोळ्या, कथा कविता,

संतसाहित्य :वर्तमानातील घडामोडी प्रकाशित करण्यात येतात. असा विविधतेने नटलेला वर्ल्ड व्हिजनचा अंक न चुकता आपल्याला रोजच पाहायला, वाचायला मिळतो. त्यात आपली चारोळी, लेख दिसला की आपल्याला किती आनंद होतो. वर्ल्ड व्हिजन म्हणजे साहित्याची प्रामाणिकपणे सेवा करणारे एकमेव डिजिटल साहित्यिक दैनिक अशी आज ओळख निर्माण होण्यास नागेशजींचे मनापासूनची कष्ट कारणीभुत आहेत हे विसरून चालणार नाही.

दैनिकात नियमितपणे विविध सदरे प्रकाशित होतात. उदा कविता व पुस्तकांचे समीक्षण, चारोळ्या, थोर विचारवंताच्या जयंती व पुण्यतिथी, ज्ञानेश्वरी, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज विचारमाला, चाणक्य नीति इत्यादी! जणू रसिकांसाठी एक मेजवानीच ! आपल्या सगळ्यांना आनंद देणाऱ्या या साहित्यिक दैनिकाचा आज दुसरा वर्धापन दिवस आहे.आज गुरुवार ७ ऑगस्ट २०२५ रोजी या दैनिकाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षात अनेक कडू गोड अनुभव मिळाले! सुख समाधानाच्या तर काही मानसिक त्रास देणाऱ्या नेहमी आठवणीत राहतील अशा अनेक घटना घडल्या.

परंतु गुरू ठाकुर यांच्या

देवाक काळजी रं – –

येईल दिवस तुझाही माणसा-

– जिगर सोडू नको ..- –

ह्या शब्दावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच आज वर्ल्ड व्हिजनचा दुसरा वाढदिवस साजरा करतांना नागेश हुलवळे यांना होणारा आनंद अवर्णनीय आहे. ह्यात शंकाच नाही. वर्ल्ड व्हिजनवर प्रेम करणारे आम्ही सगळे या त्यांच्या आनंदात सहभागी आहोत.

इवलेसे रोप लावियेलें दारी त्याचा वेलू गेला गगनावरी हे शब्द या प्रसंगी पूर्णपणे लागू पडतात ! अतिशय तळमळीने व तन्मयतेने वाढविलेले नागेशजींचे हे बाळ दिवसेंदिवस अधिक बाळसेदार होणार ह्यात शंका नाही.

वर्ल्ड व्हिजन वर प्रेम करणाऱ्या आम्हा रसिकांच्या ह्या द्वितीय वर्धापन दिनी लक्ष लक्ष शुभेच्छा!

अभिनंदन !अभिनंदन!

दश दिशात पसरो सुगंध वर्ल्ड व्हिजनचा !

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

 

 

प्रतिभा पिटके ( एक वाचक)

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा