*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुंता सोडवायलाचं हवा…!!*
फायदा तोट्याची गणिते
फक्त कागदावरच शोभतात
नात्यात ..जर..का शिरलीत
संवाद ..हिरावून ..घेतात..
जिवाला जीव लावणारी
माणसं जपावीचं लागतात
मी’चा अभिनय विसरायला
मनाला …सांगत राहतात..
कळत नकळत अचानक
नात …अबोल होतं
जुळलेल्या मनाचे धागे
उगाच ..कुरतडत बसतं..
अंधारात निराशेचा गाॅगल
अंधार गडदचं करतो
गोठलेल्या नात्याला मनात
एकसारखा छळत राहतो..
दिलखुलास संवादाने मतभेदांचा
गुंता सोडवायलाचं.. हवा
हरवलेल्या विश्वासाला बळं
अंतःकरणातून ..जोपासायला हवा
जगण्याचा आनंद लुटाया
मतभेद विसरायला हवेत
दोन पावलं.. मागेघेवून
गुंता सोडवायला हवेत..
आता कसला ..अभिमान
वाढत्यावयात ..गुंता नकोच
तृप्त भोजन ..झाल्यावरही
फोडणीची चव ..रेंगाळतेच..
बाबा ठाकूर

