पुणे – केंद्रीय आरोग्य विभागाने ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ला कोविशिल्ड या लसीची एक कोटी डोसची दुसरी ऑर्डर दिली आहे. या लसींची किंमत जीएसटीसह 210 कोटी रुपये इतकी आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या ‘रेग्युलेटर अफेअर्स’ च्या वतीने प्रकाश कुमार सिंग यांनी शासकीय कंपनी ‘एचएलएल लाईफकेअर लिमिटेड’ च्या वतीने ही ऑर्डर दिली आहे. यापूर्वी ‘सीरम’ला केंद्र सरकारने 11 जानेवारीला प्रथमच डोस खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती आणि त्यावेळी एकूण 4.5 कोटी डोस खरेदी करण्याचे ठरले आहे.
पहिली ऑर्डर ही 231 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे पहिली आणि दुसरी ऑर्डर मिळून आता केंद्र सरकारने आतापर्यंत सीरमला 441 कोटी रुपयांची ऑर्डर दिलेली आहे