*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”श्रावण महिमा”*
श्रावण रिमझिम आला बरसत
प्रसन्न वाटे उधळे रंग सुगंध।।धृ।।
सृष्टी हिरवा शालू केली परिधान
तृप्त शांत झाली मेघ बरसल्यानं
*”पुनवेस् दर्यास धरा करी रक्षाबंधन”*।।1।।
स्त्रिया मंगळागौरीस पूजिती भजती
भक्त शिवा पूजिती आरती ओवाळीती
शिव-पार्वती संतोषे देती आशीर्वाद।।2।।
पशुपक्षी दिसती मोदे विहरताना
ऋतू राजा नागपंचमी सणांचा महिना
कविकल्पनांना श्रावण करी उपकृत।।3।।
यमुना कान्हाला न्याहाळते ओढीनं
ओसरते जळ जाता अंगठा स्पर्शून
वासुदेव सोडी कृष्णास पैलतिरास ।।4।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड. महाराष्ट्र.
पिन410201.Cell.9373811677.

