सावंतवाडी :
सांगेली जवाहर नवोदय विद्यालयचा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने लोकमान्य टिळक जयंती निमित्त कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर सफर सह्याद्री शिवोत्सव मुंबई, आयोजित वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेतही नील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. नीलने आतापर्यंत त्याने चित्रकला, हस्ताक्षर, वेशभूषा, गीत गायन, कथाकथन, अभिनय, वक्तृत्व, निबंध, मॉडलिंग यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पाचशेच्या वर बक्षिसे पटकावली आहेत. हस्ताक्षरासाठी नीलला त्याचे मामा डॉ. उमेश सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

