जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ‘जागतिक कौशल्य स्पर्धा 2026’ शांघाई येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in या लिंकवर दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील तरुणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी 47 व्या जागतिक स्पर्धेमध्ये 63 सेक्टरमधून 50 देशातील 10,000 उमेदवार समाविष्ट झाले होते आणि या स्पर्धा 15 देशांत 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यांत आली होती. जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 चीन शांघाई येथे आयोजित होणार आहे.
जागतिक कौशल्य विकास स्पर्धा २०२६ आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill Development Council मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५० क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म ०१ जानेवारी २००४ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry ४.०, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot System Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्रांकरतिा उमेदवाराचा जन्म दि. ०१ जानेवारी २००१ किंवा तद्नंतर असणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या (Tis, Polytechnic, MSME Tools Rooms, CIPET, IIT, Engineering College, IHM, Hospitality Institute, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Golleges, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellery Making, Others मधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

