You are currently viewing मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांच्या कार्याचा सन्मान

मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांच्या कार्याचा सन्मान

राधानगरी येथे एकनाथ गुरव यांची बदली

मालवण:

मालवण तालुका कृषि अधिकारी श्री एकनाथ गुरव यांची विनंती बदली राधानगरी तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी झाल्याने मालवण तालुका कार्यालयाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी एकनाथ गुरव नेहमी प्रयत्नशील असायचे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धती बद्दल उपस्थितानी गौरवोदगार काढले. मालवण येथील पावणे दोन वर्षाच्या कालावधीत सर्वांचे चांगले सहकार्य लाभल्याबद्दल एकनाथ गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी सेवानिवृत्त मंडळ कृषि अधिकारी श्री. आर. एस. चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी , मालवण श्री. अमोल करंदीकर,मंडळ कृषि अधिकारी आचरा श्री. एच. आर. आंबार्डेकर, मंडळ कृषि अधिकारी पोईप श्री. डि.के. सावंत, उपकृषि अधिकारी श्री. सिताराम परब , श्री. दत्तात्रय बर्वे , श्री. धनंजय गावडे , श्री. श्रीपाद चव्हाण, दशरथ सावंत, सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती संजीवनी तांबे , श्रीमती अमृता भोगले , श्रीमती विद्या कूबल , श्रीमती स्नेहल जीकमडे, श्री. पवनकूमार सौंगडे, श्री. अश्वीन कूरकूटे, निवृत कृषी सहाय्यक आनंद धुरी व कृषि सेवक तसेच विविध योजनांचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा