फोंडाघाटमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर; अजित नाडकर्णी यांचे समाजकार्य उल्लेखनीय
फोंडाघाट
फोंडाघाट राधाकृष्ण मंगल कार्यालयात उद्या (७ ऑगस्ट २०२५) सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री. भावेश कराळे आणि अजित नाडकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले असून, त्यांनी आपले राधाकृष्ण मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून दिले आहे.
“८०% समाजकारण आणि २०% राजकारण” या तत्वाचा अंगीकार करून अजित नाडकर्णी हे सातत्याने समाजकार्य करत आहेत. या शिबिराचा लाभ फोंडाघाट परिसरातील नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा हॉल कराळे परिवार आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रमांसाठी वापरत असून, त्यांचेही या कार्यात मोठे योगदान आहे. मा. मंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून आणि PHC फोंडाघाट यांच्या विनंतीवरून हॉल तातडीने उपलब्ध करून देण्यात आला. डाॅ. यादव यांनी याबद्दल अजित नाडकर्णी यांचे आभार मानले आहेत.
“फोंडाघाट आरोग्य समस्येसाठी आपण काहीतरी ठोस करू शकतो,” असा विश्वास अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केला. या शिबिरात २०० हून अधिक महिलांची व पुरुषांची विविध आरोग्य तपासण्या विनामूल्य करण्यात येणार आहेत.
— अजित नाडकर्णी, संवाद मीडिया

