*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मंगळागौर*
मंगळागौराई अंगणी
रंग रंगांची रांगोळी
गोस्पदांच्या पावलांची
सोनं पावले नटली
पानाफुलांनी सजवा
तोरण दाराला लावा
कलशाची करू पुजा
कुंकुम टिळा भरवा
दिव्या दिव्यांनी सजली
मखमली आरास किती
देव्हाऱ्यातील समईत
लक्ष लक्ष दिपज्योती
साडी भरजरी नेसवा
चोळी खणाची तीजला
नाकी नथनी हिऱ्याची
कुंतली गजरा सजला
हिरवा चुडा हातात
पाटली सुंदर नक्षीची
गळसरी गळ्यामध्ये
ओटी खणा नारळाची
नैवेद्याला पुरणपोळी
पक्वान्नाचे वाढा ताट
बसवा मंगळागौरीला
चंदनाचे पिढे पाट
आली मंगळागौर माहेरी
मुलामांणसात बैसली
तिच्या येण्याने घराला
शोभा दिव्यत्वाची आली
.
*शीला पाटील. चांदवड.*

