*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*इतुके पुरेच आहे*
मी प्रेयसी तुझी रे दिलदार तूच आहे
प्रेमात शब्द गोड इतुके पुरेच आहे ।।
तारे नकोत मजला अन् चंद्रमा नभीचा
तू फक्त बोल सत्य इतुके पुरेच आहे ।।
वस्त्रे नकोत मजला कुठलीच भेटवस्तू
नजरेतुनी मधाळ पहाणे पुरेच आहे ।।
स्पर्शात काय आहे हव्यास नाही मजला
कृष्णासमान तूझे सन्निध पुरेच आहे ।।
तू सोबती जीवाचा हे काय स्वल्प आहे ?
मैत्रीत खंड नाही इतुके पुरेच आहे ।।
असु दे तुझे कुठे ही वास्तव्य या जगात
माझीही सय येते इतुके पुरेच आहे ।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
पिंपळनेर , जि. धुळे ४२४३०६
मो. ९८२३२१९५५०

