“रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल” च्या वृक्षवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बँगलोर येथील उद्योगपती श्री. रविशंकर डाकोजू यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका लोकाभिमुख उपक्रमात, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने आणि बँगलोर येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री. रविशंकर डाकोजू यांच्या सहकार्याने वृक्षवाटप कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात श्री. बबली राणे, ॲड. विलास परब, श्री. घनश्याम राणे, श्री. प्रवीण नाईक यांनी संयोजनात मोलाचे सहकार्य केले. श्री. विष्णू आंगणे व त्यांच्या परिवाराने आपल्या निवासस्थानी कार्यक्रम आयोजित करून उत्कृष्ट व्यवस्था पाहिली.
गावातील अनेक मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या सरपंच सौ. सुप्रिया कदम, सदस्या वंदना पारकर, पोलीस पाटील सौ. संजना आंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रदीप तळेकर यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात भर घातली. गावातील शेतकरी वर्ग, महिला वर्ग व युवकांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमास हातभार लावला.
या कार्यक्रमामुळे गावामध्ये सामाजिक एकोपा, पर्यावरण जाणीव आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक बळकट झाली आहे.
कार्यक्रमास रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष अरुण मालणकर, सेक्रेटरी रो. दीपक आळवे, रोटरी क्लब सिंधुदुर्ग चे माजी असिस्टंट गव्हर्नर व उद्योजक रो. गजानन कांदळगावकर, असिस्टंट गव्हर्नर रो. सचिन मदने, डॉ. प्रशांत कोलते, माजी असिस्टंट गव्हर्नर रो. राजन बोभाटे, उपाध्यक्ष नवीन बांदेकर, पदाधिकारी सत्यवान चव्हाण, व्यंकटेश घोगळे यांच्यासह रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, सेक्रेटरी मकरंद नाईक व इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
या उपक्रमाने गावात चैतन्याचे वातावरण निर्माण केले असून, भविष्यात अशा अनेक उपक्रमांसाठी प्रेरणा मिळाली आहे. सर्व सहकार्यकर्त्यांचे रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल वतीने मनःपूर्वक आभार.

