विषारी सर्पदंश झालेला दोन्ही रुग्णांना जीवनदान
सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील 38 वर्षीय महिलेला मण्यार या विषारी सापाने दंश केल्याचे निष्पन्न झाले होतो तर मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील 22 वर्षीय पुरुषाच्या पायाच्या अंगठ्याला घोणस या विषारी सापाने दंश केल्याचे निष्पन्न झाले होते.
मेडिसिन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रोहित हेरेकर यांचे मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी रुग्णांवर शर्थीचे प्रयत्न करुन उपचार केले. मेडिसिन विभागातील डॉक्टर्स व नर्सेस यांना दोन्ही रुग्णांचे जीव वाचविण्यात यश मिळाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे संर्पदंशावरील उपचाराकरिता आवश्यक सर्व इंजेक्शन्स उपलब्ध असून दोन्ही रुग्णांना नुकतीच रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली, असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे.
