You are currently viewing वेतन अनुदान जिल्हा स्तरावर जमा असूनही कर्मचारी 3 महिने पगाराविना

वेतन अनुदान जिल्हा स्तरावर जमा असूनही कर्मचारी 3 महिने पगाराविना

वेतन अनुदान जिल्हा स्तरावर जमा असूनही कर्मचारी 3 महिने पगाराविना.*

*ग्रा.प. कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा पगार व मागील फरक रक्कम खात्यात जमा न केल्याने उद्या जिल्हा परिषद येथे करणार ठिय्या आंदोलन*

सिंधुदुर्ग

जिल्ह्यात ७५४ ग्रा.प.कर्मचारी असून ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतन अदा करणेसाठी शासनाकडून जिल्हा परिषद कडे निधी उपलब्ध करून देऊनही आज रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल,मे,जून२०२५ या ३ महिन्यांचे वेतन आज रोजी पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही यासंदर्भात वारंवार आपल्या कार्यालयात माहिती घेतल्यावर चार दिवसात वेतन जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले जाते परंतु आज रोजी पर्यंत सदर वेतन रक्कम जमा करण्यात आलेले नाही. दर महिन्याला वेतनासाठी जिल्हा परिषद येथे येऊन पाठपुरावा केल्या शिवाय वेतन मिळत नाही. मागील नऊ महिने अशाच परिस्थितीचा सर्व त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच शासनाकडून जि.प. कडे 1/9/2020 ते 31/3/2022 पर्यंतचे सुधारित किमान वेतनातील १० महिन्याची फरक रक्कम संचालक, पंचायत राज महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून जा.क्र रा.व्य.क परा/कावी ग्रामपंचायत/ 451/2025 दि. 28/3/ 2025 रोजीच्या आदेशान्वये जि.प.जवळ दि.३/४/२०२५ रोजी रक्कम जमा असून देखिल सदर रक्कम आज रोजी पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही.
त्यामुळे काम करून देखील वेतन वेळेत मिळत नसल्याने आपले कुटुंब चालवायचे कसे? घेतलेल्या कर्जाचे हप्त्ते भरायचे कसे? मुलांचा शैक्षणिक खर्च करायचा कसा? आता पुढे गणपती उत्सवा सारखा मोठा सन देखिल जवळ आलेला आहे त्याचा देखिल खर्च अपेक्षित आहे असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.
या बाबत १२ मे २०२५ रोजी आध्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन, सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे पालकमंत्री मा.श्री.नितेशजी राणे साहेब, आमदार मा. श्री.निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांच्याच समक्ष तत्कालीन मा.उपमुख्यकार्यकारी अधिकारी(ग्रा.प.) यांनी त्यावेळी ८ दिवसांत प्रलंबित वेतन व फरक रक्कम वर्ग करण्याचे शब्द दिला होता.
या सर्व परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून माहे एप्रिल, मे, जून 2025 चे वेतन व सुधारित किमान वेतनातील 10 महिन्याची फरक रक्कम आज रोजी पर्यंत जमा न केल्याने नाईलाजास्तव उद्या मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी सका.११ वाजले पासून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांसह येऊन ठिय्याआंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कोकण विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा सचिव अभय सावंत व जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ परब यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा