You are currently viewing सावंतवाडी बस स्टैंडवर आजारीवृद्धाला सामाजिक बांधिलकी कडून जीवदान.

सावंतवाडी बस स्टैंडवर आजारीवृद्धाला सामाजिक बांधिलकी कडून जीवदान.

सावंतवाडी बस स्टैंडवर आजारीवृद्धाला सामाजिक बांधिलकी कडून जीवदान.

सावंतवाडी

गेल्या दोन दिवसापासून सावंतवाडी बसस्टैंड वर एक व्यक्ती वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडला होता याची कल्पना पोलीस धोत्रे व कांबळी यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधवला देतातच रवी जाधव व रूपा गौंडर ( मुद्राळे) यांनी सावंतवाडी बस स्टैंड वर घाव घेतली सदर वृद्ध पूर्णपणे चिखलामध्ये माखला होता तसेच कपड्यांमध्ये घाण केली होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून गरम पाण्याने सदर वृद्धाला आंघोळ घालून स्वच्छ करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा गौंडर( मुद्राळे ) गौरव रजपूत, विशाल नाईक व नितेश वरक यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा