*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री पल्लवी उमरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मैत्री*
तुझी माझी मैत्री अशी
जणू श्रावणातिल हिरवळ
शितल गंध चंदनाचा
मोगऱ्याचा सुगंधी दरवळ
झुले चैत्रबनाच्या अंगणी
मैत्री आनंदाच्या हिंदोळ्यावर
सजली सुरेख मैफिल
जाई उंच वेलू गगणावर
वाटू सुगंध मैत्रीचा
सुखदुःखाच्या वाटेवर
जपु धुंद क्षण मैत्रीचे
जीवनाच्या वळणावर
नको अविश्वासाला थारा
वाहो निरंतर मैत्रीचा झरा
सुखदुःखामधे अखंड सोबत
मैत्रीमुळेच जीवनाला अर्थ खरा
©® शब्दवैभवी पल्लवी उमरे

