You are currently viewing मोरे गावातील बंदूक कारखान्यावर पोलिसांचा छापा;

मोरे गावातील बंदूक कारखान्यावर पोलिसांचा छापा;

मोरे गावातील बंदूक कारखान्यावर पोलिसांचा छापा;

न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत संशयितांना दिली न्यायालयीन कोठडी

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील मोरे गावात २ ऑगस्ट २०२५ रोजी एका विनापरवाना बंदूक कारखान्यावर कुडाळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाहित्य, बनवण्याचे यंत्रसामुग्री, तसेच गवा व सांबराच्या शिंगांचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शांताराम पांचाळ, परेश उर्फ आप्पा धुरी, सागर घाडी, यशवंत देसाई व प्रकाश गुरव या संशयित आरोपींना कुडाळ न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी सुनावली.

या कारवाईत शांताराम पांचाळ यांच्या घरातून व परेश धुरीच्या फॅब्रिकेशन दुकानातून पोलिसांनी १,१७,००० रुपयांचे शस्त्र व बनवण्याचे साहित्य, तर सागर घाडीच्या ताब्यातून दोन बंदुका, लाकडी बट व चार जिवंत काडतुसे, तसेच यशवंत देसाई (आजरा) व प्रकाश गुरव यांच्या ताब्यातून आणखी तीन बंदुका जप्त केल्या.

या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गु. र. नं. २५१/२०२५ नुसार

शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ५, ७, २५, २७, २९

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३१

भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ४९, ३(५)

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई)
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ ऑगस्ट रोजी आरोपींना मे.न्यायालयात हजर करून १० दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत आरोपींच्या अटकेबाबत नातेवाईकांना योग्य लेखी सूचना न दिल्याचा मुद्दा, तसेच मुद्देमालाची पूर्णपणे झाली असल्याची नोंद लक्षात घेऊन कुडाळचे दिवाणी न्यायाधीश ग. अ. कुलकर्णी यांनी पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विवेक मांडकुलकर, अ‍ॅड. प्रणाली मोरे, अ‍ॅड. विनय मांडकुलकर, अ‍ॅड. वृशांक जाधव, अ‍ॅड. सुयश गवंडे, अ‍ॅड. गौरी देसाई व अ‍ॅड. सुधीर राऊळ यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

कुडाळ परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या या शस्त्र निर्मिती प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत असून, आणखी कोणाची संलग्नता आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा