के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे हिंदी ओलमपियाड परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद!
राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय, सामाजिक बांधिलकी आहे याच भावनेतून पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील के.एल.पोंदा.हायस्कूलमध्ये नुकत्याच हिंदी ओलमपियाड परीक्षा पार पडल्या.
यात हिंदी बोधिनी, हिंदी उत्तमा, हिंदी भूषण, हिंदी विशारद, हिंदी रत्न ,अशा विविध परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला!
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था द्वारे, अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलमपियाड परीक्षा २०२५ घेण्यात आली.
या परीक्षेचे आयोजन, नियोजन,व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य शाळेतील उपक्रमशील शिक्षिका, हिंदी विभाग प्रमुख सौ.अनुपमा जाधव यांनी केली. विद्यार्थ्यांना अभ्यासातील आत्मविश्वास मिळवून देत त्यांनी भाषा शिकण्याचा प्रेरणेचा जागर केला.या परीक्षेसाठी जवळपास २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आदिवासी विभागात राष्ट्रभाषा अभ्यासाला मिळालेली ठोस दिशा म्हणावी लागेल.यामुळे विद्यार्थी ,पालक, शिक्षक यांनी देखील आनंद व्यक्त केला.
दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष श्री.तरुण पोंदा, उपाध्यक्ष श्री.अजय बाफना,मानद सचिव श्री. सुधिर कामत, यांनी दिलेली प्रेरणा व शुभेच्छांमुळे शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते. असं मत सौ.अनुपमा जाधव यांनी व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोपान इंगळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.उपमुख्याध्यापिका सौ.रसिका घागस, पर्यवेक्षक श्री.सुनिल मोरे सर, पर्यवेक्षिका सौ.मनिषा पटेल मॅडम, या सर्वांनी शुभेच्छा दिल्या!
परीक्षेच्या कामकाजासाठी,सौ.अनुपमा जाधव,सौ.योगिनी तांबे,सौ.अक्षिता मोरे,श्री.रोहन चव्हाण यांचे सहकार्य लाभले. व शिक्षक बंधू व भगिनींमुळे , परीक्षा परीक्षा संपन्न झाल्या.

