You are currently viewing पहिलं प्रेम एक आठवण

पहिलं प्रेम एक आठवण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*पहिलं प्रेम एक आठवण* 

 

 

अश्रू आणि हास्य यांचा सुंदर मिलाप म्हणजे पहिल्या प्रेमाची आठवण…!

आठवणींची एक वेगळीच गम्मत असते नाही..काही आठवणी पुस्तकात जपून ठेवलेल्या मोरपंख सारख्या असतात.. मनाच्या पुस्तकात

मोरपंखासारख्या जपलेल्या अनेक आठवणींपैकी पहिलं प्रेम ही त्यातलीच एक आठवण.. मनापासून आणि नजरेपासून एक अदृश्य धाग्याची टोक धरून असतात.

माणसाच्या मनात रुजणारी ही अशी एक भावना आहे की जी कदाचित प्रेमिका प्रियकर यांच्या मनात असते ते सुद्धा कधी समजू शकत नाही.. अलौकिक अशी नाजूक…

ज्याच्यावर- जिच्यावर एकेकाळी जीवापाड प्रेम केलेल असत त्पाने- तिने प्रेम करणे काय असते हे शिकवलेले असते. प्रेमाचा खरा अर्थ त्याच्यामुळे तिच्यामुळे कळालेला असतो.

पहिल प्रेम सफल होतच अस नाही… मन सुन्न होतं. आयुष्याच्या त्या कुमार वयात ज्यांनी साथ दिलेली असते ते अचानक साथ सोडून जातात आणि आपण भावनांनी मुके होतो. कारणे काहीही असोत पण खरच इतकं कठीण असतं का पहिल प्रेम विसरणं…!

कधीतरी निवांत बसलेले असताना एखादे गाणे कानावर येते आणि मग त्या गाण्याबरोबर बऱ्याच आठवणी डोळ्यासमोरून जातात.

अगदी पहिल्या भेटीपासून ते पहिल्या ब्रेकअप पर्यंत सगळ्याच आठवणी…

काही कोडी खरच न सोडवण्याकरिता असतात. आठवणींच पण तसच

असतं… दिवस मावळतात

ऋतू बदलतात पण मनाच्या गाभाऱ्यातल पहिलं प्रेम मात्र तसच मूळ धरून उभं असत आपण मोठे होतो नवीन नाती जोडतो नी रमतोही आपल्या आयुष्यात…पण एखादी संध्याकाळ अशी येते की दूर समुद्रात दिसणारी होडी आपल्याला पुन्हा त्याच किनार्‍यावर नेऊन सोडते… इथे मी आणि पलीकडे तो कधी ही न भेटण्यासाठी…

माणूस जातो… नाती तुटतात…मार्ग बदलतात सहवास बदलतो मग आठवणी का राहतात तश्याच खडकांवर रुजलेल्या शेवाळासारख्या….ते पुसून काढण्यसाठी आपण सर्व काही सोडतो.. ते दिवस मनाच्या पटलावरून साफ पुसून काढतो तरी सुद्धा वाऱ्याची एक झुळूक येते आणि दूर गेलेलं आठवणींच जुनं पान आपल्याच मनाच्या बागेत पुन्हा दिसतं… !

खरच…पहिलं  प्रेम म्हणजे आठवणींच पान असते..

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा