ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गमध्ये ‘थ्रोईंग इव्हेंट्स’ स्पर्धा;
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नोंदणी सुरू
सिंधुदुर्ग
ऑलिम्पिकमध्ये भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या यशाचा गौरव म्हणून, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ७ ऑगस्ट २०२५ रोजी ‘थ्रोईंग इव्हेंट्स’ या जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी नीरज चोप्राने सुवर्ण जिंकले होते, म्हणून हा दिवस ‘थ्रोईंग डे’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या स्पर्धांमध्ये पुढील चार प्रकारांचा समावेश आहे –
👉 भालाफेक (Javelin Throw)
👉 गोळाफेक (Shot Put)
👉 थाळीफेक (Discus Throw)
👉 हॅमर थ्रो (Hammer Throw)
स्पर्धा पुढील वयोगटांमध्ये घेतल्या जातील:
🔹 १४ वर्षाखालील – जन्म तारीख: ७ ऑगस्ट २०१३ नंतर
🔹 १६ वर्षाखालील – ७ ऑगस्ट २०११ नंतर
🔹 १८ वर्षाखालील – ७ ऑगस्ट २००९ नंतर
🔹 २० वर्षाखालील – ७ ऑगस्ट २००७ नंतर
🔹 खुला गट – पुरुष व महिला
प्रत्येक स्पर्धेसाठी एंट्री फी आकारली जाणार असून खेळाडूंनी आधार कार्ड किंवा जन्मदाखल्याची झेरॉक्स सोबत आणणे बंधनकारक आहे. विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
या स्पर्धा डॉन बॉस्को हायस्कूल, ओरोसच्या मैदानावर सकाळी ९ वाजता सुरू होतील. सर्व खेळाडूंनी सकाळी ८ वाजता मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन डॉन बॉस्को शाळेचे प्राचार्य फादर मेलविन फेराव, उपप्राचार्य फादर रोनाल्डो वाज, मॅनेजर फादर पॉल डिसोझा, व्यवस्थापक फादर फ्रान्सिस झेविअर, बाळकृष्ण कदम, तसेच असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडुलकर आणि अध्यक्ष रणजित सिंग राणे यांनी संयुक्तरित्या केले आहे.
जिल्ह्यातील सर्व खेळाडू, पालक व क्रीडा शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रणजित सिंग राणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
कल्पना तेंडुलकर – ९३५९३९६४५०
