११ फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक
सिंधूदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या ७० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रूवारी रोजी जाहिर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी सायंकाळी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी जाहिर झाल्या होत्या. यातील चार ग्राम पंचायत निवडणुका बिनविरोध झाल्याने ६६ ग्राम पंचायतसाठी प्रत्येक्ष मतदान झाले होते. त्याचा निकाल 18 जानेवारी रोजी जाहिर झाला होता. मात्र सरपंच आरक्षण जाहिर न झाल्याने या ग्रामपंचायतींवर अद्याप सरपंच निवाडी झाल्या नव्हत्या. मात्र अलीकडेच म्हणजे 28 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहिर झाले. यामुळे आता जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या या 70 ग्रामपंचायतिंवर सरपंच निवाडीसाठी 11 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.