You are currently viewing कॅमेर्‍यासोबतच ..माझं जगणं..!

कॅमेर्‍यासोबतच ..माझं जगणं..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतच ..माझं जगणं..!*

 

गहाण ठेवावा इतका

मी वजनी नाही

एका फ्रेममध्ये मावण्याइतका

मी बुटका नाही..

 

छळणा-या जिभांचे सर्प

कॅमेर्‍याने माझ्यापासून लपवले

बर्फात मौनाला थिजवून

कायमचे डिलीट केले..

 

हिरव्या आकांक्षाचे मोहर

लेन्समधून डोळ्यांत फुलवले

अंगवस्त्र गुलाबांचे नेसवून

घरोघरी मला पोहचवले..

 

ऋणाइतके प्रिय मित्र

कॅमेर्‍याने माझ्याकरता जपले

प्रौढ झाल्यासारखे वाटताचं

तेच..दूडदूड धावत आले..

 

हवेत हात फेकून

स्वतःला जगजाहीर कर

आयुष्य इनामात देऊन

जगण्याचा जल्लोष कर..

 

बाबा ठाकूर धन्यवाद

कॅमेर्‍यासोबतच..माझं जगणं

सत्तरावी रचना ठाकूरी उवाच सात

प्रतिक्रिया व्यक्त करा