*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पवित्र प्रांगण*
~~~~~~~~~
दयाघनाचे अस्तित्व कृपाळू
चैतन्याचा साक्षात्कार आहे
तीच अलौकिक परमसुखदा
आत्म्यालाच सुखावते आहे
पंचभूतांचेच स्पर्श चराचरी
भगवंताचे अवीट रूप आहे
मंगलमयी सारे त्याच्या ठाई
मुक्तीचे पवित्र्य प्रांगण आहे
जन्माजन्माचे सुकृत भाळी
त्याची ही अगाध कृपा आहे
~~~~~~~~~~~~~~
. *विगसा*
.
