“उत्तम लोके यांनी आधी स्वतःचं स्थान तपासावं” – भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांचा सणसणीत प्रत्युत्तर
कणकवली –
भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी उत्तम लोके यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
दळवी म्हणाले की, “आपण ज्या पक्षात आहोत, तिथं आपलं नेमकं स्थान काय आहे, याची उत्तम लोके यांनी आधी खातरजमा करावी.”
ते पुढे म्हणाले की, “स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठावान असल्याचा दिखावा करणाऱ्यांना आमच्या नेत्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. नाईक कुटुंबीय जेव्हा गरज असते, तेव्हा कुठे असतात हे विचारण्याची वेळ आली आहे.”
त्यांनी वैभव नाईक – सुशांत नाईक यांच्यातील वाद, चेक बाऊंस प्रकरणं, मारहाण प्रकरण, देण्या-घेण्याचे व्यवहार, आणि “ठक सैनिक” म्हणून लागलेला आरोपही थेट उघड केला.
दळवी यांनी इशारा दिला की, “पुनः एकदा टीका केली, तर जशास तसे उत्तर दिलं जाईल आणि उरलेली प्रकरणं बाहेर काढली जातील.”
“दिखाऊ निष्ठावानांनी गप्प बसावं, अन्यथा आमच्याकडे पुरावे आहेत,” असा ठाम इशारा तालुकाध्यक्ष दळवी यांनी दिला आहे.

