गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य संगीत महोत्सव – श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचा सुरेल उपक्रम 🎶
कुडाळ
श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत आणि विद्यालयातील समस्त विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम रविवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असून संगीतप्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
🌸 कार्यक्रमाची रूपरेषा :
स्थळ: पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांचे निवासस्थान, आंदुर्ले – सावरीचे भरड, सिंधुदुर्ग
संपर्क: स्कायलाईन – 9670700404
प्रमुख आकर्षणं :
देवता पूजन व महाआरती
गुरुपूजन सोहळा व दीपप्रज्वलन
भजन व गायन – श्री संदेश बांदेलकर, कु. भक्ती नाईक
साथसंगत: तबला – श्री धनंजय सावंत, कु. प्रणव परब
पखवाज – श्री दत्तप्रसाद खडपकर, श्री सचिन कातवणकर
पखवाज सहवादन – श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांचे सादरीकरण
(ताल बडीसवारी, ब्रम्हताल, चंद्रचौताल, हिमांशु, चुडामणी, शिखर, लक्ष्मीताल, मदनलाल इ.)
ढोलकी झाली बोलकी (सह्याद्री वाहिनी फ्रेम):
श्री. संदेश पारधी, ओमकार वेंगुर्लेकर, प्रदीप वाळके, संकेत म्हापणकर, तनय राणे, गौरव पाटकर, राज कुंभार
भरतनाट्यम नृत्य सादरीकरण – कु. जान्हवी ठाकूर
सुश्राव्य संगीत मैफल
गायिका – सौ. प्रचिती गोगटे (M.A. संगीत, गोवा)
साथसंगत: ऑर्गन – श्री भालचंद्र केळूसकर बुवा
हार्मोनियम – श्री गजानन मेस्त्री, श्री अमित उमळकर
तबला – डॉ. सचिन कचोटे (कोल्हापूर), डॉ. दादा परब
पखवाज – श्री अजित मळिक, श्री विशाल केळूसकर
तबला सहवादन: कु. जय मुंडये, कु. दिव्या मुंडये
लहेरा – गुरुवर्य श्री प्रमोद मुंडये सर
कार्यक्रमाच्या मान्यवर उपस्थिती :
जेष्ठ तबला वादक: श्री महेशजी पाटील (इचलकरंजी)
संगीत अलंकार गायक: श्री दिलीप ठाकूर सर, श्री अजित गोसावी सर
ध्वनीव्यवस्था: आर. पी. साऊंड – पाट. श्री प्रताप वेंगुर्लेकर, कु. ओमकार वेंगुर्लेकर
छायाचित्रण: श्री प्रमोद कळंगुटकर (बांदा)
आयोजक व निमंत्रक :
श्री राजा सामंत (नेरूर), श्री दाजी जुवाटकर (खवणे), श्री वैभव खानोलकर (खानोली), श्री अक्षय सातार्डेकर (मालवण), श्री मोरेश्वर सावंत (आंदुर्ले)
पुण्यस्मरण :
कै. भुषण देसाई बुवा आणि कै. सतिश शेजवलकर सर
सर्व संगीत रसिक, श्रोते, पालकवर्ग व ग्रामस्थ यांना विनम्र आवाहन –
या गुरुपौर्णिमेच्या सुरेल उत्सवात सहभागी व्हा व संगीताचा आनंद लुटा!
– श्री जगन्नाथ संगीत विद्यालय परिवार.
