You are currently viewing संत तुलसीदास

संत तुलसीदास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *”संत तुलसीदास”*

 

तुलसीदास आहेत महान कवी संत

रामायण प्रचारार्थ अर्पिले जीवनIIधृII

 

गंगा यमुना काठी अवतरले राजापुरांत

सद्गुरु लाभले त्यांना सुकरखेत

गुरूंकडून ऐकले राम कथा कथनII1II

 

बालपणी हरपले माता पिता छत्र

मूळ नक्षत्रांवर त्यांचा जाहला जन्म

जन्मताच त्यांना होते दात अद्भुतII2II

 

दासी पुनियाने त्यांचे केले संगोपन

वेदोपनिषद ग्रंथ इतिहास पुराण

शिकले शेष सनातन यांचे सानिध्यातII3II

 

वैवाहिक जीवनांत त्यांचे रमले ना मन

मानती कबीर मीरा रहीम संत एकनाथ

ब्रज अवधी भाषांवर प्रभुत्व अवगतII4II

 

राम लल्ला नरछू गीतावली रामज्ञाप्रश्न

जानकी पार्वती मंगल बरवे रामायण

लिहिले भरत मिलाप थप्पय रामायणII5II

 

कृष्ण गीतावली कुंडलिया रामायण

रचिले दोहावली ध्रुव प्रश्नावली ग्रंथ

सर्वत्र ईश्वर आहे सर्वा केले प्रबोधनlI6II

 

गीतावली विनयपत्रिका कविता संग्रह

हनुमान चालीसा रामचरितमानस

लिहिले अनन्य काव्यग्रंथ करू वंदनII7II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा