*ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निसर्ग उत्सव*
धरा हिरवाई नटण्याचा
आला सण श्रावणी उत्सव
काळ रिमझिम पावसाचा
रम्य सृष्टी निसर्ग उत्सव
-१-
जादू करे श्रावणी उत्सव
चैतन्याने खळाळे निर्झर
देवकार्या उत्साही उत्सव
संजीवनी त्यांना जे जर्जर
-२-
कोसळती जलौघ प्रपात
गिरी दरी भ्रमंती निवांत
नेत्र निवले मन प्रशांत
पक्षी कूजन मंत्र मुग्धात
-३-
पिके उभी डोलती शिवारी
जलाशये नितळ निर्मळ
इंद्रधनू क्षितीजी ते भारी
उपासना कुठे ती निर्जळ
-४-
सण नागपंचमी पहिला
बालसौख्या पूजा जिवतीची
भजे हरतालिका महिला
शिवामूठ वाहती धान्याची
-५-
सारंगाला समुद्री जायला
मुहूर्त नारळी पूनवेला
राखी बांधे बहिण भावाला
नाते अतूट सहोदरेेला
-६-
आरोग्याला सात्त्विक आहार
पूर्ण मास श्रावणी उत्सव
तिर्थक्षेत्री धार्मिक विहार
संस्कृतीचा पवित्र उत्सव
-७-
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
पुनावळे पुणे ३३
