You are currently viewing शारदा विद्यामदिरात विद्यार्थ्यांकरता प्रज्ञा पंडित यांचे लोकमान्य टिळक या विषयावर व्याख्यान

शारदा विद्यामदिरात विद्यार्थ्यांकरता प्रज्ञा पंडित यांचे लोकमान्य टिळक या विषयावर व्याख्यान

चैतन्य आणि नाट्यतुषार या संस्थांच्या माध्यमातून ठाण्यात समर्थ कट्ट्याचे उद्घाटन, लोकमान्य टिळक व्याख्यान

 

ठाणे – चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्यतुषार यांच्या संयुक्त विद्यमाने, शारदा विद्या मंदिर, नौपाडा, ठाणे यांच्या सहकार्याने “समर्थ कट्टा” या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. सौ. प्रज्ञा पंडित यांचे “लोकमान्य टिळक : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान होणार आहे.

 

हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता शारदा विद्या मंदिर, नौपाडा, ठाणे येथे होणार आहे.

 

लोकमान्य टिळक यांचे विचार, त्यांचे शालेय जीवन, अभ्यासावरील प्रेम, आणि समाजासाठी त्यांनी केलेले योगदान यांची ओळख विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून करून दिली जाणार आहे. मुलांच्या भाषेत, गोष्टीरूपातून त्यांचं जीवन आणि शिकवण मांडली जाणार आहे.

 

कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका सौ. सविता सोनवणे मॅडम (शारदा विद्या मंदिर) यांचे लाभले आहे.

कार्यक्रमाचे संयोजन अ‍ॅड. रुपेश पवार (अध्यक्ष, चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट) आणि श्री. राजेंद्र गोसावी (संस्थापक व संचालक, नाट्यतुषार) करीत आहेत.

 

संयोजक

 

एडवोकेट रुपेश पवार

चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष

 

राजेंद्र गोसावी

नाट्यतुषार ,संस्थापक, संचालक

प्रतिक्रिया व्यक्त करा